अनैतिक संबंधातून झाला असावा खून असा पोलिसांचा संशय
किनवट : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – किनवट मध्ये अचानक झालेल्या इंगळे यांच्या खुनाने चर्चेला उत आला आहे शहरात भूमीअभिलेख कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बेल्लोरीच्या एका छोट्या नाल्याच्या काठावर ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघड झाली़ मयतावर बलात्कार करून खून झाला असावा असा संशय आहे. मयताच्या उजव्या हातावर मुक्ता इंगळे असे नाव गोंदलेले असल्याने तिची ओळख पटविण्यास मदत झाली.
मयत महिला ही माळबोरगाव येथील असून तिचे सासर विदर्भातील पुसद तालुक्यातील लोणधरी येथील आहे. गतवर्षी तिच्या पतीचे निधन झाले. मयत मुक्ता इंगळे हिला दोन मुली असून ती माहेरी माळबोरगाव येथे राहत होती़ एक मुलगी दुसऱ्या वर्गात तर दुसरी मुलगी सहा वर्षांची आहे़ किनवट मधील मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या आपल्या मुलीला सोडण्यासाठी ती २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते चारचे दरम्यान आली होती़ त्यानंतर ती परत गेली ती एका दुचाकीवर आली होती, असे शिक्षक व पोलिसांचे म्हणणे आहे़ हा खून अनैतिक संबंधातून २२ फेब्रुवारीच्या रात्री झाल्याचा पोलिसांचा संशय आहे़.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, पीएसआय मलय्या स्वामी, अनिल कांबळे,घटना स्थळी धाव देऊन त्यां प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे व वैद्यकीय तपासणी चाचणी साठी ते दवाखान्यात नेले होते.त्या खुनाचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.