मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यासाठी मागच्या ३० जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीतील खालील १३ प्रकारच्या योजना लागू करण्यात आल्या होत्या. सोबतच यासंदर्भातील शासन निर्णय काढण्याचे आदेश मंत्री डॉ. संजय कुठे यांनी दिला होता. एकूण ७ शासन निर्णय त्यात इमाव, सशैमाप्र, विमाप्र विभाजअ विभागाकडून जाहीर केले गेले आहेत.
तसेच विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी एक हजार करोड रुपये एवढा निधी दिला जाणार आहे. त्यातील तब्बल ५०० करोड निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. याआधी शासनाच्या वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाकडून चालू असलेल्या योजनांच्या माध्यमातून ढगाळ समाजातील घटकांना लाभ मिळत असलेल्या तब्बल १६ योजना वगळून आता अनुसूचित जमातींसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण १३ योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयात ढगाळ समाजातील बांधवांसाठी स्पर्धा परीक्षेच्या शुल्कात सवलत, घर बंधने , स्पर्धा परीक्षेसाठी निवासी प्रशिक्षण देणे , गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनसाठी वसतिगृह निर्माण करणे, सैन्यात भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणे, समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित शाळेत शिक्षण घेता यावे, तसेच आर्थिक सवलत देणे अशा प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.
१. महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.
२. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरिता जून ते सप्टेंबर या ०४ महिन्यांसाठी चराई अनुदान देणे.(प्रायोगिक तत्वावर)
५. ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील जमातीसाठी ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय- मान्यता प्राप्त) प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य.
६. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षा-पूर्व निवासी प्रशिक्षण देणे.
७. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करून देणे.
८. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.
९. नाशिक, नागपूर ,नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती-क प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.
१०.भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमीहिन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे.
११. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे.
१२. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे.
१३. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना योजनेच्या पहिल्या टप्प्यात १०,००० घरकुल बांधून देणे.
- विषयक वृत्त आरोग्यदात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत