नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील सुमारे दोन महिन्यांपासून आयपीओ लाँच होण्याचे सत्र थांबले होते. परंतु आता पुन्हा एकदा तीन आयपीओ लाँच (3 IPO launch) होणार आहेत. शेयर बाजारातील मजबूती पाहता अनेक कंपन्या आपले आयपीओ लाँच (3 IPO launch) करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणुक (IPO investment) करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
स्टील मॅन्युफॅक्चिरिंग कंपनी (Steel Manufacturing Company) श्याम मेटेलिक्स अँड एनर्जीचा आयपीओ (IPO) 14 जूनला ओपन होईल आणि 16 जूनरोजी बंद होईल.
कंपनीची आयपीओद्वारे 909 कोटी रुपये जमवण्याची योजना आहे.
सध्या मेटेलिक्स आणि सहकारी कंपनी एसएसपीएलवर 850 कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे.
श्याम मेटेलिक्स अँड एनर्जी आयपीओचा प्राईस बँड
श्याम मेटेलिक्स अँड एनर्जीने (Shyam Metallics and Energy) आयपीओसाठी प्राईस बँड 303 ते 306 रुपये प्रति शेयर ठरवला आहे.
या आयपीओमध्ये 657 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असेल आणि 252 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल असेल.
ज्या अंतर्गत कंपनीचे प्रमोटर आपली भागीदारी विकतील. या आयपीओची लॉट साईज 45 शेयर्सची आहे.
श्याम मेटेलिक्सकडे सध्या 3 स्टील मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स आहेत, जे ओडिसाच्या संभलपुर आणि जमुरियासह पश्चिम बंगालच्या मंगलपुरमध्ये आहेत.
कंपनी वार्षिक 57 लाख टनपेक्षा जास्त स्टीलचे उत्पादन करते.
देशातील सर्वात मोठी ऑटो पार्ट बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचा (Sona Comstar) आयपीओ सुद्धा 14 जूनरोजी लाँच होईल.
कंपनीने या आयपीओद्वारे 5500 कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
हा देशातील कोणत्याही ऑटो पार्ट कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ आहे.
अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म ब्लॅकस्टोनची (American investment firm Blackstone) गुंतवणूकवाली कंपनी डेपर कॉमस्टारचा आयपीओ सबस्क्रीपशनसाठी 16 जूनपर्यंत खुला राहील.
या आयपीओसाठी कंपनी 300 कोटी रुपयांचे फ्रेश शेयर जारी करेल.
कंपनीने शेयरची इश्यू प्राईस 285-291 रुपयांच्या बँडमध्ये ठरवली आहे.
कृपया हे देखील वाचा:
राज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी ! मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर
‘नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही’ – शरद पवार