बहुजननामा ऑनलाइन टीम – साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) नं शुक्रवारी मोठी घोषणा केली. त्यानं सोशलवरून घोषणा करत सांगितलं की, तो मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावर (26/11 Mumbai Terror Attacks) आधारित सिनेमा तयार करणार आहे. या सिनेमाची स्टोरी 26/11 च्या हल्ल्यातील हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या अवतीभोवती फिरेल. संदीप उन्नीकृष्णन यांनी(26/11 Mumbai Terror Attacks) ताज हॉटेलमधील शेकडो लोकांना सुरक्षित बाहेर काढलं होतं. परंतु ते स्वत: मात्र दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झाले होते. मेजर (Major) असं या सिनेमाचं नाव आहे.
आता महेश बाबूनं यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर महेश बाबू हा सिनेमा प्रोड्युस करत आहेत. अदिवी शेष यात मेजर उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणार आहे. हिंदी आणि तेलगू भाषेत सिनेमा रिलीज केला जाणार आहे. यात सई मांजरेकर आणि शोभिता धुलिपाला हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणाऱ्या अदिवी शेष याचा लुकही दिसत आहे. महेशनंही ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे.
#MajorBeginnings to the inspiring journey of the nation's undying hero, Major Sandeep Unnikrishnan!! Best wishes to @AdiviSesh and the entire team! 👍🏻https://t.co/Kr0mmKPzsk@majorthefilm @sonypicsindia @GMBents @sonypicsprodns @AplusSMovies @SashiTikka
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) November 27, 2020
26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचं बायोपिक निर्माणाधीन आहे हे समजल्यानंतर आता चाहत्यांमध्ये आणखीच उत्सुकता निर्माण झाली आहे. महेशनं शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.