राजस्थान : बहुजननामा ऑनलाइन – बुंदी जिल्ह्याच्या लाखेरमध्ये एक मोठी घटना घडली असून, येथील मेज नदीमध्ये बस कोसळली असल्याची माहिती मिळत आहे. यावरून परिसरात खळबळ उडाली असून, रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे.
माहितीनुसार बस कोटा जिल्ह्यातून सवाईमाधोपूर येथे जात असताना तेथे बुंदीजवळील लाखेरीमध्ये एक बस मेज नदीत कोसळली आहे. या बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी भरलेले होते. स्थानिकांनी आणि प्रशासनाने वेळेवर येऊन बचावकार्य सुरु केले. तसेच नदीच्या जवळ लोकांची गर्दी झाली.
Rajasthan: Several feared dead after a bus falls into a river near a village on Kota Lalsot Mega Highway in Bundi. More details awaited. pic.twitter.com/FlLtjes9H7
— ANI (@ANI) February 26, 2020
अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अंतर सिंह आणि एसपी शिवराज सिंह घटनास्थळी रवाना झाले. सर्व लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, काही लोक अजूनही अडकलेले असू शकतात. त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.