Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – हडपसर येथील एका युवतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. तब्बू शेख (वय, १९) असे या युवतीचे नाव आहे. या युवतीने आत्महत्या का केली याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, तब्बू शेख हि हडपसर पांढरे मळा येथे राहत होती. हि युवती गंगा रेसिडन्सी सोसायटीमध्ये घरकाम करत होती. तर रविवारी त्या युवतीने इमारतीच्या गच्चीवरून खाली उडी मारली. तिच्या डोक्याला जोरात मार लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्त वाहू लागले. त्या ठिकाणी लोंकानी गर्दी केली. तब्बूला गंभीर जखमी अवस्थेत बघून लोंकानी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तिला जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Comments are closed.