कोयंबटूर : वृत्तसंस्था – तामिळनाडु येथील कोयंबटूर अविनाशी या ठिकाणी लॉरीने दुभाजक तोडून समोरुन आलेल्या व्हॉल्वो बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे़. या अपघातात १९ जणांचा मृत्यु झाला आहे. आज पहाटे सव्वा तीन वाजता हा अपघात झाला. बंगळुरुहून केरळमधील एनार्कुलमकडे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची व्हॉल्वो बस जात होती.
#UPDATE Deputy Tehsildar of Avinashi: 19 people – 14 men and 5 women, died in the collision between a Kerala State Road Transport Corporation bus & a truck near Avinashi town of Tirupur district. https://t.co/pOss4LTAtv
— ANI (@ANI) February 20, 2020
बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. कोइमतूर -सेलम महामार्गावर केरळमधील एक ट्रक समोरुन येत होता. तो त्याच्या पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले व त्याने दुभाजक तोडून समोरुन येणाऱ्या बसला जोरात धडक दिली़ त्यात बसची उजवी बाजू संपूर्ण कापली गेली. या अपघातात १९ जणांचा मृत्यु झाला असून त्यात १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.