बहुजननामा ऑनलाईन
राज्यात मागील 24 तासांमध्ये आणखी 184 पोलीस कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर चार पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, तरी देखील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच कोरोना योद्ध्यांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 19 हजार 74 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरु असलेले 3 हजार 728 जण आहेत. तर आतापर्यंत 15 हजार 156 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 190 वर पोहचला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
184 police personnel of Maharashtra Police tested positive for #COVID19 & 4 died in the last 24 hours, taking the total number of infections in the force to 19,074 including 3,728 active cases, 15,156 recovered cases and 190 deaths: Maharasthra Police pic.twitter.com/WYz02Pgmji
— ANI (@ANI) September 13, 2020
राज्यातील 19 हजार 74 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2 हजार 77 अधिकारी व 16 हजार 997 कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या 3 हजार 728 पोलिसांमध्ये 469 अधिकारी व 3 हजार 259 कर्मचारी आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 15 हजार 156 पोलिसांमध्ये अधिकारी 1 हजार 591 व 13 हजार 565 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मत्यू झालेल्या 190 पोलिसांमध्ये 17 अधिकारी आणि 173 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.