पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – घरगुती वादातून सावत्र बापानेच 15 वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या करण्याचा खळबळजनक प्रकार दापोडी येथे गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील बॉम्बे कॉलनी येथे सुमारे १५ दिवसांपूर्वी हे कुटुंब राहयला आले आहे. दोन मुली त्यांची आई आणि सावत्र वडिल असे चौघे जण या कुटुंबात होते. मुळचे खडकी येथील असलेले सावत्र वडिल रिक्षाचालक आहे. तर आई खासगी रुग्णालयात आया म्हणून काम करते.
रिक्षाचालक वडिलांबरोबर आईचे हे दुसरे लग्न आहे. दोन मुली आणि सावत्र वडिल यांच्यात घरगुती कारणावरुन वाद होत असत. यातील मोठ्या मुलीसोबत भांडणे झाली. त्यात वडिलांनी हिचा गळा दाबून खुन केला असल्याचा संशय आहे. याबाबतची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तो पळून गेला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव स्मृती रुग्णालयात हलविला आहे. भांडणाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सावत्र वडिलांनी अत्याचार करुन मुलीचा खुन केला असावा, असा संशय व्यक्त केला जात असून ते शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस संशयित रिक्षाचालक बापाचा शोध घेत आहे.
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/bahujannama/
- वजन कमी करण्यासाठी रोज खा दही ! टेन्शनही होईल दूर, ‘हे’ आहेत ५ लाभ
- तुम्ही मागच्या खिशात पाकीट ठेवता का ? ‘हे’ आहेत ३ धोके ! जाणून घ्या
- महिनाभर गोड खाणे टाळले तर थांबेल सांधेदुखी ! होतील ‘हे’ ५ आश्यर्चकारक फायदे
- संगणक ‘टायपिंग’मुळे ‘कार्पल टनल सिंड्रोम’चा धोका ! जाणून घ्या ४ लक्षणे, ३ उपाय
- केस गळतीवरील रामबाण उपाय सापडलाय, ‘हे’ होतील ३ फायदे
- आरोग्यासाठी चांगला पर्याय भाज्या आणि ग्रीन ज्युस, ‘हे’ आहेत ७ फायदे
- मोड आलेल्या मूगाच्या सेवनाने रहाल फिट आणि हेल्दी! ‘हे’ आहेत ६ फायदे