बंगळुरू : वृत्तसंस्था – बंगळुरुमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांचा खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्वातंत्र्य हवं होतं म्हणून आपण असं केल्याचा धक्कादायक खुलासा मुलीने केला आहे. डेटवर गेल्याने आपल्याला वडीलांनी कशी मारहाण केली हे मुलीने सांगितले आहे. तिच्या 19 वर्षीय प्रियकराचाही या गुन्ह्यात सहभाग आहे.
मुलगी अल्वयीन असल्याने तिची ओळख उघड झालेली नसून ती पोलिसांच्या ताब्यात आहे. रविवारी पोलीसांनी प्रियकराला अटक केली आहे. वडिलांनी मुलीचे प्रियकरासोबतचे नाते स्विकारण्यास नकार दिला होता. तिला शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले होते. तिचा मोबाईलही वडिलांनी काढून घेतला होता शिवाय इंटरनेट वापरावरही मर्यादा आणली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलगी आणि तिचा प्रियकर अनेकदा मॉलमध्ये फिरायला जायचे. फोनवर बोलायचे. वडिलांना हे कळळ्यावर त्यांनी हे नातं संपवायला सांगितले होते. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. मुलीवर बंधनं आणल्याने तिने हे पाऊल उचललं असा पोलिसांचा अंदाज आहे.
प्रियकराने गिफ्ट दिलेल्या मोबाईलवरून दोघेही चोरून संवाद साधत असतं. अनेकदा वडिलांनी मुलीला त्रासही दिला. यानंतर दोघांनी चर्चा करून खुनाचा कट रचला. मुलीने वडिलांना झोपेच्या गोळ्या दिल्या. यानंतर ते बेशुद्ध आहेत की नाही हे पाहण्यासाठी सतत त्यांना कानाखाली मारत राहिली. प्रियकराला बोलावून मग धारदार शस्त्राने खून केला. दोघांनी खुनाची कबुली दिली आहे असे उप पोलीस आयुक्त एन शशीकुमार यांनी सांगितलं आहे. एन शशीकुमार यांनी मुलीने दिलेल्या जबाबानुसार सांगितले की, मुलीनुसार वडिलांना प्रेमसंबंधाबाबत कळल्यानंतर त्यांनी तिला पट्ट्यानेही मारहाण केली होती.