बहुजननामा ऑनलाइन टीम – मुरबाड पोलीस नामा ऑनलाइन रिपोर्टर अरुण ठाकरे; मुरबाड म्हसा कर्जत रस्त्याला खड्डे आणि भ्रष्टाचाराचे लागलेल ग्रहण सुटण्याचे नाव काही घेत नाही . कायम खड्डेमय असलेला रस्ता सुस्थीतीत आणण्यासाठी चार वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने बारा कि.मी. साठी मंजूर केलेले पन्नास कोटी रुपये अर्धवट कामावर खर्च करुन तत्कालीन शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ व उपअभियंता यांनी ठेकेदाराला बील काढून देण्यास मदत केली. आणि हाच रस्ता पुन्हा महाराष्ट्र रस्ते विकास विभागाकडे वर्ग केला . या विभागाने जवळपास एकशे आठ कोटी मंजूर केले असून संपूर्ण रस्ता आरसीसी पध्दतीने करण्यात येत आहे . परंतू हे काम काँक्रीटचे आहे की नाममाञ सिमेंट आणि दगडपावडर खडीचा आहे असेच दिसून येत संपूर्ण रस्त्यात भेगा आणि खड्डे पडले आहेत . हा रस्ता अतिशय सुमार दर्जाचा झालेला असून फक्त चार वर्षे ठेकेदार या रस्त्यावर देखभाल करणार असून आताच हा रस्ता निकृष्ठ झालेला आहे . तर चार वर्षा नंतर याची जबाबदारी शासनाने का घ्यावी अशी विचारणा माजी पंचायत समिती सदस्य श्याम राऊत यांनी केली असून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे .
शहापूर मुरबाड कर्जत राज्य मार्गावर म्हसा गाव येत असून या ठिकाणी पौष पौर्णिमेला महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली म्हसोबाची याञा भरली जाते . पंधरा दिवस चालणा-या याञेला लाखो भाविक भेट देत असतात . याञेनिमीत्ताने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते . दरवर्षी रस्ता खड्डेमय व धुळीचे साम्राज्य तयार होत असल्याने , चार वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पन्नास कोटी रुपये मंजूर करुन काम सुरु केले . अर्धवट काम असतांनाच हा रस्ता एमएसआरडीसी कडे वर्ग केला . परंतू मंजूर असलेली संपूर्ण रक्कम खर्च दाखवली . पुढे 2018 साली या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन तो एमएसआरडीसीकडे वर्ग करून एकशे आठ कोटी रुपये बारा किमी साठी तरतुद केली . या रस्त्याचे एकूण अंदाजपञक आठशे पन्नास कोटी असून , शहापूर मुरबाड ते कर्जत पर्यंत हा रस्ता तयार होणार आहे . परंतू मुरबाड ते म्हसा पर्यंत बारा किमी चा एकशे आठ कोटीचा सुरु असलेला रस्ता जर निकृष्ठ झाला असून अनेक ठिकाणी खड्डे व भेगा पडलेल्या आहेत . या आगोदर देखील निकष्ठ भाग काढून टाकण्याची वेळ ठेकेदारवर आली होती . हे काम पीएसके इंन्फ्रा प्रा. लि .या संस्थेच्या नावावर मंजूर असून उप ठेकेदार म्हणून जिजाऊ कंट्रक्शन करीत आहे . जिजाऊ कंट्रक्शनचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी नुकतेच वाडा येथे रस्त्यावर पडलेल्या खड्या संदर्भात अंदोलन केले होते . माञ त्यांच्या संस्थे कडून होत असलेले निकृष्ठ काम त्यांना दिसत नाही का असा अरोप करत श्याम राऊत यांनी केला असून चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे .
( शहापूर मुरबाड कर्जत हा रस्ता पीएसके इंन्फ्रा प्रा . लि . कंपनी च्या नावावर असून पोट ठेकेदार जिजाऊ कंट्रक्शशन हे काम करीत आहे . या रस्त्या सबंधी माहिती घेऊन रस्ता दुरुस्त केला जाईल . खिस्ते कार्यकारी अभियंता एमएसआरडीसी बांद्रा , मुंबई )
( सदरच्या रस्त्यावर कशा पध्दतीचे तडे पडले आहेत . त्याची पाहणी करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल . तसेच चार वर्षे ठेकेदाराने या रस्त्यावर देखभाल दुरुस्ती करायची आहे . गायकवाड उपअभियंता आरटीडी. बांद्रा मुंबई )
( खड्डे व तडे गेलेला भाग काढून टाकला जाईल . डी जी होले . जीजाऊ कंट्रक्शशन )