मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्तांच्या गुरुवारी (दि.2) प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या होत्या. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाने उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. उपायुक्तांना नेमणूकीच्या ठिकाणी हजर होऊन तात्काळ कार्यभार स्विकारून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आज (रविवार) नव्याने आदेश जारी करुन बदली करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त यांना पूर्वीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश सह पोलीस आयुक्त (प्रशासन) नवल बाजाज यांनी दिले आहेत. बदलीच्या ठिकाणी हजर झालेल्या पोलीस उपायुक्तांनी आपल्या पूर्वीच्या ठिकाणी 7 जुलै रोजी हजर राहुन त्याबाबतचा अनुपालन अहवाल कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे.
‘या’ पोलिस अधिकार्यांच्या झाल्या होत्या बदल्या. आता त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
1. परमजित दहिया (परिमंडळ 7 ते परिमंडळ I)
2. प्रशांत कदम (संरक्षण ते परिमंडळ 7)
3. गणेश शिंदे (विशेष शाखा 1 ते बंदर परिमंडळ)
4. डॉ. रश्मी करंदीकर (बंदर परिमंडळ ते सायबर)
5. शहाजी उमाप (प्रकटीकरण ते विशेष शाखा 1)
6. मोहन दहिकर (परिमंडळ 11 ते प्रकटीकरण)
7. विशाल ठाकूर (सायबर ते परिमंडळ 11)
8. संग्रामसिंह निशानदार (परिमंडळ 1 ते अभियान)
9. प्रणय अशोक (अभियान ते परिमंडळ 5)
10. नंदकुमार ठाकूर ( सशस्त्र पोलीस, ताडदेव ते मुख्यालय 1)