पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय संविधान संवर्धन समिती व संविधान सन्मान समिती यांच्या वतीने देण्यात येणार २०१८ संविधान रत्न पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर तसेच तळेगावच्या माजी नगराध्यक्षा रंजनाताई भोसले यांना जाहीर करण्यात आलं आहे.
भारतीय संविधान संवर्धन समिती व संविधान सन्मान समिती यांच्या वतीने दरवर्षी संविधान रत्न पुरस्कार देण्यात येत असतो, त्याचप्रमाणे याही वर्षी संविधान रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. २०१८ संविधान रत्न पुरस्कार हा गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक सांस्कृतिक कार्य करणारे धम्मक्रांती पुरस्कार व्याख्यानाचे सातत्याने आयोजन करून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणारे रमाई महोत्सव समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळेगाव येथील बंगल्यामध्ये भारतीय संविधानाचे लेखन केले त्या बंगल्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या तसेच संविधानाचा प्रचार आणि प्रसार तळागाळात जाऊन काम करणाऱ्या तळेगावच्या माजी नगराध्यक्षा रंजनाताई भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे.
२१ नोव्हेंबर ला सायंकाळी ५. ३० वाजता पत्रकार भवन येथे ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे. इतेच नव्हे तर ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत.
यावेळी लताताई राजगुरू, अविनाश महातेकर, पीएन इनामदार सदानंद शेट्टी, रमेश बागवे, अभय छाजेड, सचिन विटकर, रवींद्र माळवदकर, अडवोकेट विवेक चव्हाण, पल्लवी जावळे, विकास पासलकर, एस एस परशुराम वाडेकर, बाळासाहेब चांदराव, रोहिदास गायकवाड, अशोक शिरोळे, राहुल डंबाळे, हनुमंत साठे, राहुल तायडे, विवेक बनसोडे, आदींची उपस्थित राहणार आहे.