पुणे : बहुजननामा ऑनलाइन – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पुणे युनिटने आज (मंगळवार) एका आयकर अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पुण्यातील सेलिसबरी पार्क येथील बोधी टॉवरमधील आयकर कार्यालयात करण्यात आली.
लाच घेणाऱ्या आयकर अधिकाऱ्याने एका विकसकाकडे आयकराची रक्कम कमी करुन देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी विकसकाने याची तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पुणे युनिटकडे केली होती. त्यानुसार आज सेलिसबरी पार्क येथील बोधी टॉवरमधील आयकर कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. आयकर अधिकाऱ्याला विकसकाकडून १ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.