लातूर : बहुजननामा ऑनलाइन – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मजबूत करण्यासाठी व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी समता परिषदेचे संघटन वाढवा, असे आवाहन ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी पदाधिकारी व कार्यकत्र्यांना केले. अ. भा. महात्मा फुले समता परिषदेची जिल्हास्तरीय बैठक ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील अंबाजोगाई रोडवरील हॉटेल मयुरामध्ये आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बापुसाहेब भुजबळ यांनी कार्यकत्र्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून रवी सोनवणे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत, जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, ॲड. वसंतराव उगले, भोजणे यांची उपस्थिती होती. यावेळी समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकत्र्यांनी मनोगत व्यक्त केल्याची माहिती लातूरचे तालुकाध्यक्ष पद्माकर वाघमारे यांनी दिली. सूत्रसंचलन ॲड. इरफान शेख यांनी केले.