अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – विदर्भ शिंपी समाजाच्या वतीने युवक व महिलांकरिता शिबिराचे आयोजन चांदूर बाजार येथील गो. सी. टोम्पे महाविद्यालयात १२ व १३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील युवक व महिलांकरिता चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये समाज मंडळाचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.चांदूर बाजार येथे दोन दिवस चालणाऱ्या शिबिरामध्ये वृध्दांची कुटुंबामध्ये होणारी अवहेलना, स्वयंरोगजार, मोबाईल दुष्परिणाम, महिला सक्षमीकरण, समाजासाठी आरक्षण, संत नामदेव महाराजांची ७५० वी जयंती महोत्सव आदींवर चर्चा होणार आहे. १२ ला शिबिराचे उद्घाटन तहसीलदार निकिता जावरकर यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शिंपी समाजाचे अध्यक्ष गुणवंत वाकरे, प्रमुख उपस्थिती नयना कडू, विजया मुळदकर, चंद्रकांत ताठे, भाष्कर टोम्पे, राजू किटे, अशोक भिसे, अविनाश रेभनकर, विजय आमटे, मोरेश्वर उज्वलकर, राजेश नेरकर, गजानन देवगीकर, किरण गचके, वर्षा नानेटे, शिल्पा पिंजरकर, रेखा धिमे, कपिल उजगावकर यांची उपस्थिती राहणार आहे. तर १३ जानेवारीला स्वच्छता अभियान व समारोपीय कार्यक्रम होईल. यावेळी प्राजक्ता राऊत, अविनाश कोल्हटकर, सीताराम पवार, शरद किटे, ईश्वर घिरडे आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन किरण जावरकर, नितीन ईश्वरे यांनी केले आहे.