नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या २२४ व्या जयंती निमित्त दि. २० नोव्हेंबर रोजी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ, नांदेड यांच्या वतीने नांदेड येथे प्रसिद्ध साहित्यीक प्रा. डाॅ. मारोती कसाब यांचे व्याख्यान तसेच सामाजिक चळवळीत योगदान असलेल्या समाजसेवकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लसाकम परिवार व संयोजन समितीच्या वतीने या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ, नांदेडच्या वतीने आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. याचबरोबरोबर समाजोपयोगी व महामानवांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर प्रकाश टाकणा-या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जात असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील दि. २० नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी १२ वाजता नरहर कुरुंदकर सभागृह, पीपल्स काॅलेज परिसर, नांदेड येथे व्याख्यान व भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प्रमुख वक्ते प्रख्यात साहित्यीक प्रा.डाॅ. मारोती कसाब हे असून ते ”अस्पृश्यांच्या शिक्षणाचे आद्यप्रवर्तक लहुजी साळवे” या विषयावर महामानवांच्या जीवनकार्याविषयी समाजाशी निगडीत असे प्रबोधनात्मक व्याख्यान देणार आहेत.
लसाकमचे पुर्व महासचिव बालाजी थोटवे हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहे इतकेच नव्हे तर लसाकमचे मराठवाडा सचिव निरंजन तपासकर यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. तर सरस्वती महाविद्यालय किनवटचे प्राचार्य डाॅ.आनंद भंडारे,शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालय मुखेडचे प्राचार्य डाॅ.मनोहर तोटरे,वै. धुंडा महाराज महाविद्यालय देगलूरचे उप प्राचार्य डाॅ. विश्वनाथ कंधारे व विष्णूपुरी प्रकल्प नांदेडचे उप अभियंता इंजि.अरुण कलवले यांसह आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत.
विशेष म्हणजे भारत खडसे ( नांदेड ), काॅ.दत्ता गवलवाड ( इस्लापूर ),संपादक उत्तम बाबळे( भोकर ),रमेश बर्दापुरे ( मुखेड ),उत्तम गवाले ( नायगाव ) यांचा सत्कार होणार आहे. इतकेच नव्हे तर लसाकमचे मराठवाडा उपाध्यक्ष भारत कलवले, जिल्हाध्यक्ष प्रा.सी.एल.कदम, जिल्हा सचिव संजय मोरे, प्रा.व्यंकट वाघमारे, माधव कांबळे, बी.एम. बसवंते, के.एम.गाडीवान, मारोती भाटापूरकर, एस.एन. जांभळीकर, डी.डी. गायकवाड, नामदेव कंधारे, प्रा. शिवाजी सुर्यवंशी, भगवान सोनटक्के, बालाप्रसाद भालेराव, चंद्रकांत ठाणेकर, आनंद कांबळे, अॅड.एम. एल.गायकवाड व लसाकम परिवाराच्या वतीने या सोहळ्यात बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.