वाशीम : पाेलीसनामा ऑनलाईन-येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा सागर रावले यांना उत्कृष्ट राष्ट्रनिष्ठ प्रदुषण मुक्ती पुरस्काराने 22 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र कपीलाधार जि. बीड येथे शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार, उमाकांत शेटे आदींची उपस्थिती होती.
शिवा संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. श्रीक्षेत्र कपीलाधार येथे 22 नोव्हेंबर रोजी भव्य शिवा संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला देशभरातून वीरशैव समाजाबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. वाशीम येथील रेखा रावले यांनी वाशीम ते जम्मू कश्मीर हे अंतर सायकलने प्रवास केला. तसेच या दरम्यान प्रदुषण मुक्त, बेटी बचाओ, बेटी पढाओ, नेत्रदान, अवयदानाबाबत जनजागृतीचा संदेश दिला. रेखा रावले यांच्या कार्याची दखल घेत शिवा संघटनेच्या वतीने त्यांना यावर्षीचा उत्कृष्ट राष्ट्रनिष्ठ, प्रदुषण मुक्तीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याचे वितरण 22 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र कपीलाधार येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
या पुरस्कार विरतण समारंभाला वाशीम जिल्ह्यातील शिवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार बोनकिले, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजयआप्पा कास्टे, जिल्हा सरचिटणीस मनिषआप्पा मखमले, शहर अध्यक्ष गोपालआप्पा महाजन, अमर बुकसेटवार, बबनआप्पा रावले, सागरआप्पा रावले, श्याम बास्टेवार, सोमेश्वरआप्पा महाजन, चंद्रकांतआप्पा बिचेवार यांच्यासह शिवा संघटनेच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती, अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे भगवानआप्पा कोतीवार यांनी दिली.