गडचिरोली : बहुजननामा ऑनलाइन – केंद्र शासनाने ओबीसी मागासवर्गीय आयोगाला घटनादत्त अधिकार प्रदान केल्यानंतर राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्याची तयारी दर्शविली आहे. या अनुषंगाने राज्य शासनाच्या व्हीजेएनटी, ओबीसी सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यामुळे लवकरच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभे राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यातून ओबीसी वसतिगृहासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हास्तरावरील विशेष समाज कल्याण आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील काही समाजकल्याण आयुक्तांनी स्थानिक पातळीवर जमिनीचा शोध घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. विशेष बाब म्हणजे मुला-मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहाचे प्रस्ताव मागविण्यात आल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये जमिनीचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील समाज कल्याण आयुक्त कार्यालयाने एका जमिनीचा शोध घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. तर दुसऱ्या वसतिगृहासाठी जमिनीचा शोध सुरू आहे. यामुळे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभे राहणार आहे.
गडचिरोली : केंद्र शासनाने ओबीसी मागासवर्गीय आयोगाला घटनादत्त अधिकार प्रदान केल्यानंतर राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्याची तयारी दर्शविली आहे. या अनुषंगाने राज्य शासनाच्या व्हीजेएनटी, ओबीसी सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे लवकरच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभे राहणार आहे.