दौंड – बहुजननामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील यवत येथे एका महिलेची मोठा दगड चेहऱ्यावर घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हि हत्या यवत जवळ असणाऱ्या महावितरण पावर हाऊसच्या पाठीमागील माळरानावर घडली असून या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
या हत्येची माहिती मिळताच यवत चे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हि महिला कोण आहे व तिची हत्या कुणी व का केली याबाबत यवत पोलीस तपास करत आहेत.
हि हत्या रात्रीच्या वेळी करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खून झालेल्या महिलेची अजून ओळख पटली नसून तिच्या हातावर रवी देवा असे नाव गोंदवलेले आहे. महिलेचे वय अंदाजे 40 च्या आसपास असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असुन पुढील तपास यवतचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर हे करीत आहेत.