सांगली : बहुजननामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव दंगलीला एक वर्ष पूर्ण होत असून दंगलीतील गुन्हेगार मोकाट आहेत या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना क्लीनचिट देऊन मुख्यमंत्री पक्षपातीपणा करत आहेत. असा आरोप इतिहासतज्ञ् श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे.
भीमा कोरेगाव लढाईला २०१ पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने या लढाईचे सेनापती वीर शिदनाक यांच्या सांगलीतील कळंबी गावात बुधवारी वीर शिदनाक शौर्य परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रसिद्ध इतिहासतज्ञ् श्रीमंत कोकाटे हे प्रमुख उपस्थिती होते. दरम्यान वीर शिदनाथ यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजातील सैनिकांनी पेशव्यांच्या विरोधात लढाई लढली होती. ती कोण्या हिंदूंच्या विरोधात नव्हती मात्र तरी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न आज केले जात आहेत. यातूनच मागच्या वर्षी भीमा कोरेगाव येथे भ्याड हल्ला घडला होता. इतकेच नव्हे तर आज या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असून हल्ल्यामागील गुन्हेगार अद्यापही मोकाट फिरत आहेत. याचबरोबर कारण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सूत्रधारांना क्लिनचिट दिली आहे. असे इतिहासतज्ञ् श्रीमंत कोकाटे यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे वीर शिदनाथ यांचा इतिहास आणि शौर्य समाजासमोर यावे, या उद्देशाने मागच्या २ वर्षांपासून परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी परिषदेचे अध्यक्ष सुरेश दुधगावकर तसेच वीर शिदनाथ यांचे वंशज आणि मागासवर्गीय समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.