अकोला : बहुजननामा ऑनलाईन – भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुढे करून शहरी नागरिकांची डोकी भडकविण्याचे काम मोदी आणि फडणवीस सरकार करीत आहेत. असे वक्तव्य केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर पत्रकारांना बोलतांना म्हंटले सरकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुढे करून शहरी नागरिकांची डोकी भडकविण्याचे काम मोदी आणि फडणवीस सरकार करीत आहेत. इतकेच तर हत्यारे सापडलेल्या सनातन्यांवर कारवाई करण्यातही कुचराई केली जात आहे, हा दुटप्पीपणा समजून आता नागरिकांनी देशाला वाचविण्यासाठी सरकारला धडा शिकवायला हवा.
शहरी नक्षलवादी म्हणून मुंबई पोलिसांनी कारवाई केलेल्या लोकांकडे कोणतेच हत्यार सापडलेले नाही. त्याचवेळी सनातन्यांकडे बंदुका, बॉम्ब, हत्यारे सापडली. त्यांना पाठीशी घातले जात आहे. आतापर्यंत सापडलेले सर्व हत्यारधारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाले आहेत. त्यांच्या हत्यारांचाही लोकांवर परिणाम होत नाही, असे दिसत असल्याने शहरी नक्षलवादाची संकल्पना मांडली जात आहे, तर हत्यार न सापडलेल्यांना शहरी नक्षलवादी म्हणून नागरिकांची डोकी भडकविली जात आहेत. शहरी नक्षलवादी कोण आहेत, हे न ठरविताच नक्षलवादाचा मुद्दा लोकांपुढे नेला जात आहे. हा प्रकार मोदी, फडणवीस यांना वेडाचे झटके आल्यासारखा आहे. देशात सर्वच स्तरावर ब्लॅकमेलिंगची राजनीती सुरू आहे. ५०० कोटींपर्यंत मालमत्ता असलेल्या ७५ हजार कुटुंबांनी देश सोडून इतर देशात स्थायिक होणे पसंत केले आहे. सरकारच्या जाचाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्या कुटुंबांना स्थानिक पोलीस, आयकर विभाग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अंमलबजावणी संचालनालयाकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी देश सोडल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान पक्षाचे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, सिद्धार्थ सिरसाट, पराग गवई, पुरुषोत्तम अहिर, महादेव सिरसाट व विलास जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षाशी युती व्हावी, ही आमची भूमिका आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसकडे ३७ जागांवर प्रभावी उमेदवार नाहीत. त्यापैकी केवळ १२ जागांची आमची मागणी आहे. आमचा कोणताही उमेदवार निवडणूक न लढताही आघाडीसाठी तयार आहे, मात्र अजेंड्यावर बोलणी करण्यासाठी कोणीही तयार नसल्याची वस्तुस्थिती आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले.