मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मुस्लिम काँग्रेसची ‘व्होट बँक’ आहे. असे वक्तव्य मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांनी केले आहे. मात्र कमल नाथ यांनी मुस्लिम मतदारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.
एका आयोजित सभेत बोलतांना मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांनी मुस्लिम काँग्रेसची ‘व्होट बँक’ आहे असे म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याचबरोबर मागील निवडणुकीमध्ये मुस्लिम बहुल भागात ९० टक्के मतदान का नाही झाले, याची चौकशी करा. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत संघाच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे.
याचबरोबर मागील नोंदी पाहण्याची माझी तुम्हाला विनंती आहे. संघाचे मतदार काय करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते काय करत आहेत. आरएसएसचे लोक विखुरले आहेत. त्यांच्याबाबत तुम्ही मला माहिती द्या. छिंदवाडाबाबत तेथील लोक मला सांगतात त्यांची एक घोषणा आहे, जर हिंदूंना मतदान करायचे असेल तर ‘हिंदू वाघ मोदीं’ना मतदान करा. जर मुसलमानांना मतदान करायचे असेल तर काँग्रेसला द्या. या केवळ दोन ओळी आहेत. ते मतदारांना जास्त शिकवायला जात नाहीत असेही ते म्हंटले. इतकेच नव्हे तर ही त्यांची रणनीती आहे. यासाठी तुम्ही सर्वजण सतर्क राहिले पाहिजे. कृपया तुम्ही मागील नोंदी तपासून पाहा. हे सर्व इंटरनेटवर उपलब्ध आहे. जिथे मुसलमान मतदान आहे. तिथे किती टक्के मतदान झाले आहे. जर ५०-६० टक्के मतदान झाले असेल तर ९० टक्के मतदान का झाले नाही. मागील निवडणुकीचे ‘पोस्टमार्टम’ करणे आवश्यक आहे. मुसलमान समाजाचे ९० टक्के मतदान झाले नाही तर आपले मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही ८० च्या दशकाबाबत बोलत आहात. पण मी ९० च्या दशकाबाबत सांगत आहे आणि आपल्यासमोर आकडेवारी आहे असेही ते म्हंटले.
मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते कमलनाथ हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.