पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्य शासनाच्या आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे समितीच्या अध्यक्षपदी अशोक लोखंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पुणे शहर मातंग समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या सदस्यपदी रामदास साळवे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिल्यामुळे त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला.
आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी संगमवाडी येथील साडे 5 एकर जमिनीवर आरक्षण कायम केले असुन 18 कोटी रूपयाचा निधी पुणे महानगरपालिकेकडुन उपलब्ध केल्याबद्दल दादासाहेब सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी जनरल कामगार माथाडी सेना, दलित महासंघ, लुहजी महासंघ, लहुजी संघर्ष सेना, लहुजी शक्ती सेना, लहुजी छावा आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे समितीच्या अध्यक्षपदी अशोक लोखंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल बहुजननामाच्या टीम कडून देखील अशोक लोखंडे यांचे अभिनंदन.