सदर तक्रारदार महिला ही सिनेसृष्टीत छोट्या मोठ्या भूमिका करते. शिवाय जुहू परिसरात ती वास्तव्यास आहे. महिला सहकलाकाराशी गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी अरमान आणि त्याचा मित्र दिलीप राजपूत यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर महिला आणि अरमान आणि त्याचा सहआरोपी यांनी मिळून एका प्रोजेक्टमध्ये ५० लाखांची गुंतवणूक केली. मात्र, हा प्रोजेक्ट समाधानकारक न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातूनच २ डिसेंबर रोजी सरआरोपी दिलीप याने महिलेला फोन करून अश्लील शिवीगाळ केली. विशेष म्हणजे या सगळ्याची त्याने अरमानला कल्पनाही दिली होती. इतकेच नाही तर या प्रकारानंतर अरमानने पुन्हा महिलेला फोन करून तिच्याशी गैरवर्तवणूक करत अश्लील भाषा वापरली आणि धमकावले आहे.
यानंतर त्या महिलेने याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीही अरमानला त्याच्या मैत्रिणीली मारहाण केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली होती. या सर्व पकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिनेसृष्टीत छोट्या मोठ्या भूमिका करत असल्याने तिची पूर्वीपासून अरमानसोबत ओळख होती. ५ महिन्यांपूर्वी एका पार्टीदरम्यान अरमानने तक्रारदार महिलेची ओळख सहआरोपी दिलीप याच्याशी करून दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये घनिष्ठ मैत्रीचे संबंध तयार झाले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला.