मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ओबीसी समाजाच्या मनात मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी भीती निर्माण केली आहे. इतकेच नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव आहे त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत असा पलटवार शैक्षणिक मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते, दरम्यान सभाग्रहात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. इतकेच नव्हे तर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात ठेवा, जर ठेवला नाही तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी दिला होता. याचबरोबर सर्व विरोधी पक्षाची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आहे मागास आयोगाच्या शिफारसी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे वाचून दाखवले नाहीत आयोगाच्या शिफारशी वाचून दाखवण्यापेक्षा संपूर्ण अहवाल दाखवावा अशी मागणीही अजित पवार यांनी त्यावेळी केली.
विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपाची कोंडी केली. त्यावर मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव आहे त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. इतकेच नव्हे तर सभाग्रहात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी विरोधक करत आहेत अहवाल पटलावर येताच काही वकील न्यायालयात जातील, या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असा विरोधकांचा डाव आहे. असा पलटवार शैक्षणिक मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
याचबरोबर आम्ही नियम आणि कायद्याने नीट काम करत असताना विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये या साठी मागच्या दाराने प्रयत्न करत असल्याची टीका शैक्षणिक मंत्री विनोद तावडे यांनी केली.