सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – राजकीय व सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्यरत करणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगतानाच तिळगुळ समारंभाच्या निमित्ताने मराठा समाजाला एकत्रित आणून ऋणानुबंध निर्माण करण्याचे मनोहर सपाटे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी केले. मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने आयोजित तिळगुळ समारंभ व समाजातील नगरसेवकांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे, देवव्रत वासकर महाराज, किरण पवार, माउली पवार, ज्ञानेश्वर सपाटे, हरिभाऊ चौगुले, चंद्रकांत येवले, हरिदास गायकवाड, प्रा.महेश माने, दत्ता भोसले, चैतन्य महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, शाम महाराज उखळीकर, लक्ष्मण महाराज चव्हाण, प्रा.अनिल बारबोले, सुरेश पवार, वसंत येळे, काशिनाथ डोंगरे, बजरंग अवताडे, विनायक पाटील, दादासाहेब देशमुख, मोहन गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक गणेश वानकर, अमोल शिंदे, विनोद भोसले, संतोष भोसले, प्रिया जयकुमार माने, वत्सला बरगंडे, सुरेखा काकडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तिळगुळाच्या माध्यमातून आपसातील भेदा -भेद विसरून एकत्रित येणे हाच उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेले समाजकारण – राजकारणातील मराठा समाज बांधवांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामुदायिक प्रयत्न करावा अशी अपेक्षा वासकर महाराजांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेफाली विभूते यांनी केले. तर आभार प्रा.महेश माने यांनी मानले.