पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने पुणे शहर व परिसरात सुरु असलेल्या भीम फेस्टिव्हलला खासदार संजय काकडे यांनी भेटी देण्यास सुरुवात केली आहेत. दांडेकर पूल येथील भीम फेस्टिव्हलला नुकतीच भेट दिल्यानंतर त्यांनी आज विमाननगर येथील भीम फेस्टिव्हलला भेट दिली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. खासदार काकडे यांनी ठेका धरताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
खासदार संजय काकडे यांनी नुकतीच विमाननगर येथील भीम फेस्टिव्हलला भेट दिली. या प्रसंगी आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक राहुल भंडारी, नगरसेवक शंकर पवार, ओंकार कदम इत्यादी मान्यवर आणि हजारो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी त्यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
दरम्यान, दांडेकर पूल येथील अखिल भिमज्योत सेवा संघाच्यावतीने आयोजित भीम फेस्टिव्हलला खासदार संजय काकडे यांनी नुकतीच भेट दिली होती. यावेळी नगरसेवक शंकर पवार, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेवक परशुराम वाडेकर, अखिल भिमज्योत सेवा संघाचे अध्यक्ष तानाजी ताकपेरे व उत्सव प्रमुख हृषिकेश ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.