नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबई उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची ९० दिवसांची मुदत आणखीन ९० दिवसांनी वाढवून देण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज ( ११ जानेवारी ) निर्णय राखून ठेवला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची ९० दिवसांची मुदत आणखीन ९० दिवसांनी वाढवून देण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. दरम्यान राज्य सरकारच्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय राखून ठेवला असून या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी स्थानिक न्यायालयासमोर यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले अहे. पुणे पोलिसांनी या संदर्भात वकिल सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापिठातील प्राध्यापक शोमा सेन, दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, कार्यकर्ते महेश राऊत आणि केरळचे रहिवासी रोना विल्सन यांना माओवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपावरून बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली जून महिन्यात अटक केली आहे.
विशेष म्हणजे, वकिल सुरेंद्र गडलिंग आणि अन्य काही जणांविरोधात सत्र न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्यासाठी दिलेली मुदतवाढ रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. इतकेच नव्हे तर भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गडलिंग आणि अन्य काही जणांना आरोपी करण्यात आले होते.याचबरोबर पुणे पोलिसांनी गडलिंग, नागपूर विद्यापिठातील प्राध्यापक शोमा सेन, दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, महेश राऊत आणि केरळच्या रहिवासी रोना विल्सन यांना माओवाद्यांशी संबंध ठेवणे आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली होती. इतकेच नव्हे तर राज्य सरकारच्यावतीने ऍड. निशांत काटणेश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल केली आणि या प्रकरणी त्वरित सुनावणी घेण्याची विनंती केली होती. तसेच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राज्य सरकारची याचिका दाखल करून घेतली होती. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशाला वेळीच स्थगिती दिली नाही, तर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील अरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले जाऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना आपोआपच जामीन मिळू शकेल, असा दावा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला होता.