पुणे – भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगली घडली. या घटनेत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई अद्याप पर्यत मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे.अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.रमा आठवले आणि जयदीप सकट या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
यावेळी राहुल डबाळे म्हणाले की,कोरेगाव भीमा येथे दंगल झालेल्या घटनेस तीन महिन्याचा कालावधी होऊन गेला.मात्र अद्याप पर्यत तेथील पिडीतांना राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत दिली गेली नाही.या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे.असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रमा आठवले म्हणाल्या की,कोरेगाव भीमा येथील घटनेत आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई सरकार ने अद्याप पर्यँत दिली नाही.सुरुवातीला 25 हजार रुपयांची मदत दिली.मात्र आजअखेर काही मदत नाही .यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले असल्याने सरकारने आम्हाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी त्यांनी यावेळी केली.