सिल्लोड (औरंगाबाद) : बहुजननामा ऑनलाईन-भिल समाजाच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत भील समाजाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषा व नृत्यांच्या सादरीकरणासह जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हि टाळाटाळ होत असल्याचे आंदोलकांनी म्हंटले आहे.
याबाबत अधिक माहितीअशी की, एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेतर्फे सिल्लोड तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले आदिवासी भिल जातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे. तसेच रद्द करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र संचिकेची पुनर्विलोकन करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावे म्हणून महिलांसह पारंपरिक वेशभूषा करीत तालुक्याच्या उपविभागीय कार्यालया समोरच( दि.१२ ) सोमवार पासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दिलीप बर्डे यांनी आदिवासी भिल जमातीचे प्रमाणपत्र आम्हाला जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपविभागीय अधिकारी यांना निवेदना द्वारे दिला आहे. दरम्यान जिल्हाध्यक्ष शिवाजी शेळके, जिल्हाउपाध्यक्ष विजय सुरासे, दिपक बागुल, आनंदा बहिरम, अंकुशराव पवार, अशोकराव सोनवणे, सीताराम सोनवणे, विक्रम काळे उपस्तित होते.
याचबरोबर या उपोषणाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एमआयएम, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे.