बिलासपुर : वृत्तसंस्था – जातीयवादी भाजपा आणि काँग्रेस आरक्षण संपवण्याचा प्रयन्त करत आहेत. असे बहुजन समाज पार्टीच्या सर्वे सर्वा मायावती यांनी म्हंटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जांजगीर-चंपाच्या अकलतारा विधानसभा मतदारसंघातील तरौड़ या गावामध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या सर्वे सर्वा मायावती यांनी जातीयवादी भाजपा आणि काँग्रेस आरक्षणाला निष्क्रिय करण्याचा तसेच हळू हळू आरक्षणाला संपवण्याचा प्रयन्त करत आहेत. इतकेच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे दलित, आदिवासीं तसेच इतर मागासवर्गीयांना आरक्षण . विशेष म्हणजे सरकारी नौकाऱ्यांचा लाभ मिळाला. याचबरोबर त्यांनी भाजपा आणि काँग्रेसवर जातीयवादी मानसिकता असल्याचा आरोप केला आहे. सुरवातीपासून भाजापा आणि काँग्रेसने जातीयवाद निर्माण करण्याचे काम केले आहे. असेही ते म्हंटले आहे.
विशेष म्हणजे छत्तीसगडच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मायावती यांची बहुजन समाज पार्टी आणि माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची जनता काँग्रेस सोबत युती करून निवडूणुकींच्या रिंगणात उतरले आहेत.