वेंगुर्ले : बहुजननामा ऑनलाइन – जानेवारी २०१९ मध्ये वेंगुर्ले येथे होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा मेळाव्याचे संपर्क कार्यालय वेंगुर्ले-हॉस्पिटल नाका येथे सुरू करण्यात आले असून याचे उद्घाटन माजी आमदार शंकरभाई कांबळी यांच्या हस्ते झाले.
यावेळी उद्योजक दादासाहेब परुळकर, भंडारी समाज अध्यक्ष रमण वायंगणकर, जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष अतुल बंगे, सरचिटणीस राजू गवंडे, वेंगुर्ले ऐक्यवर्धक संघाचे उपाध्यक्ष ॲड. श्याम गोडकर, चंद्रकांत गडेकर, ॲड. प्रकश बोवलेकर, सरचिटणीस विकास वैद्य, सत्यवान साटेलकर, आनंद बांदेकर, अंबरिश मांजरेकर, जिल्हा युवा भंडारीचे अध्यक्ष समाधान बांदवलकर, सारिका काळसेकर, तृप्ती साळगावकर, सत्यवान पेडणेकर, रमेश नार्वेकर, भंडारी पतसंस्थेचे अध्यक्ष जयराम वायंगणकर, सुधाकर तांडेल, भरत आवळे, नीलेश चमणकर, गजानन गोलतकर, गोपाळ रगजी आदी उपस्थित होते. भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुलेर्ने काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गटबाजीचे राजकारण न करता सर्वांनी एक मताने, एका विचाराने एकत्र येऊन समाज हित साध्य करण्यासाठी भंडारी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन शंकर कांबळी यांनी केले.