मुंबई : वृत्तसंस्था – देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचे लग्न गेल्या काही दिवसापासून अनेक कारणांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. आता जोधपूरच्या एका कलाकाराने निळ्या सूटमध्ये निक जोनस आणि पिवळ्या बॉर्डरच्या साडीमध्ये प्रियांका चोप्रा अशी ही बाहुली बनवली आहे. जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी लग्न केले होते.
प्रियांकाचे हे लग्न अगदी राजेशाही थाटात पार पडले. हा विवाह सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा होता. लग्नाचे रिसेप्शनही अगदी असेच डोळ्यांची पारणे फेडणारे होते. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेचा खास बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या लग्नाचे ड्रोनने कुणी फोटो घेऊ नये यासाठी खास इस्राईलवरून १२ शूटर्स बोलवण्यात आले होते. प्रियंकाने लग्नात केलेल्या फटाक्यांचा आतिष बाजीमुळे आणि लग्नात हत्ती घोड्यांचा वापर केल्यामुळे तिच्यावर टीकाही करण्यात आली होती.
या आधी सैफ – करीनाचा मुलगा तैमूर याचा बाहुला बाजारात आला होता. सेलिब्रिटी जोडप्याची बाहुली बनवल्याची ही पहिलीच घटना आहे.