शिक्रापूर : बहुजननामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ मध्ये उसळलेल्या दंगलीच्या पर्श्वभूमीवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी १४ गुंडांवर तडीपारीची कारवाई केली आहे. या कारवाईत भोसरीमधील २ जण असून उर्वरीत शिरुर तालुक्यातील आहेत. ७ सराईत गुंडांवर तडीपारीची कारवाईची अंमलबजावणी करण्यात आली असून उर्वरीत ७ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे.
या गुंडांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर दौंड हवेली खेड या पूर्ण तालुक्याच्या हद्दीतून व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
कैलास अरुण पाटील (रा.वय ३५ आळंदी रोड भोसरी) महेश अशोक सातपुते ( वय ३०आळंदी रोड भोसरी) भरत शहाजी गव्हाणे (वय ३०रा.कोरेगाव-भीमा ता. शिरूर )किरण काळूराम दरेकर (रा.सणसवाडी ता.शिरूर) आकाश लक्ष्मण धाडगे ( वय १९ रा. सणसवाडी ता. शिरूर )वैभव अनंत साळुंखे (वय २१ रा.बांदल कॉम्प्लेस शिक्रापूर )परमेश्वर मधुकर गोरे (वय २० रा.बांदल कम्प्लेंकस शिक्रापुर ) या सात जणांवर कारवाईची अंमलबजवणी करन्यात आली. तर पांडुरंग नवनाथ जाधव (रा. बांदल कॉम्प्लेक्स शिक्रापुर) सचिन गोविंद शिनगारे रा. (बांदल कॉम्प्लेस शिक्रापूर )दीपक तुकाराम वाळके रा.बांदल कॉम्प्लेक्स शिक्रापुर)अशोक छगनराव मुसळे राहणार सणासवाडी ता. शिरूर) सतीश अरूण केदारी (बांदल कॉम्प्लेक्स शिक्रापूर) विशाल निव्रुती गवळी (शिक्रापुर) प्रमोद श्रीमंत पवार (रा. चौफुला वाजेवाडी ता. शिरूर) यांच्यावर तडीपारी कारवाई करण्यात येणार आहे.