पुणे : बहुजननामा ऑनलाईन – रिपब्लिकन जनशक्तीच्या वतीने मांडावण फाटा ता. शिरूर, जिल्हा पुणे येथील पारधी तसेच भटक्या विमुक्त मागासवर्गीय घटकांतील लोकांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सोमवारी ( २६ नोव्हेंबर ) जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आले.
मांडावण फाटा ता.शिरूर, जिल्हा पुणे येथील पारधी तसेच भटक्या विमुक्त मागासवर्गीय घटकांतील लोकांना गायरान जागेवर शासनाच्या घरकुल योजनेचा तसेच अन्य शासकीय सुविधा मिळाव्यात अश्या अनेक मागण्यांसाठी रिपब्लिकन जनशक्तीच्या वतीने सोमवारी ( २६ नोव्हेंबर ) जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आले. रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
विशेष म्हणजे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहू आंदोलनाला पा ंबाा दिला. यांसह चबरोबर नगरसेविका राजश्री काळे, हरिलाल भोसले, किसन भो सले, यांसमवेत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.