उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – पश्चिम उत्तर प्रदेशचे माजी मंत्री कोकब हमीद यांचे काल बुधवार ( ३१ ऑकटोबर ) ला संध्याकाळी दीर्घ आजाराने त्यांच्या पैतृक निवासस्थानी निधन झाले आहे. कोकब हमीद हे ६७ वर्षाचे होते. इतकेच नव्हे तर कोकब हमीद हे मुस्लिम समाजाच्या राजकारणातील दिग्गज नेते मानल्या जायचे.
कोकब हमीद हे पश्चिम उत्तर प्रदेशचे माजी मंत्री होते. त्यांना मुस्लिम समाजाच्या राजकारणातील दिग्गज नेते मानल्या जायचे. विशेष म्हणजे ते ५ वेळा आमदार होते. इतकेच नव्हे तर ते ३ वेळा मंत्रीही होते. पश्चिम उत्तर प्रदेशच्या राजकारणात ३० वर्षा पासून साकरीय सक्रिय राहिले आहेत. तर बहुजन समाज पार्टी च्या सरकार मध्ये ते मंत्रीही राहिले होते.
राजकीय कारकीर्द
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्ये नंतर १९८५ ला बागपत विधानसभा मतदारसंघातून कांग्रेस पक्षा कडून कोकब हमीद हे पहिल्या वेळेस आमदार म्हणून निवडून आले होते. ५२,००० मतांनी ते निवडणूक जिकंले होते. यानंतर नारायण दत्त तिवारी सरकारच्या वेळी ते उर्जा राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर १९८९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी १९९१ ला निवडणूक लढवली नाही. यानंतर १९९३ च्या निवडणुकी मध्ये ते पुन्हा निवडून आले. त्यावेळी त्यांना कांग्रेस विधानसभेच्या उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्यांनी १९९६ ला काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला. आणि अजित सिंह यांच्या किसान कामगार पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकून ते लोक दल विधिमंडळाचे नेते झाले.
यानंतर २००२ आणि २००७ ला ते रालाेद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी त्यांना प्रदेश मंत्रिमंडळात पद देण्यात आले आहे. तसेच २०१२ ला सपा च्या लाटेत ते निवडणुकीत पराभूत झाले होते.