हैद्राबाद : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही चहावाले होतात, आता पंतप्रधान आहात, पंतप्रधानांसारखे वागा चहावाल्यासारखे वागू नका असा खोचक सल्ला एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर हे पंतप्रधान आहेत की कोण आहेत? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
हैद्राबाद येथे एका आयोजित रॅली मध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक गोष्टीत चहा आणतात. कडक चहा, नरम चहा, चहापत्ती, निर्णय घेतला की चहाचा विषय. चर्चा करायची असेल तर चहाचा विषय अरे तुम्ही चहावाले होतात. इतकेच नव्हे तर आता पंतप्रधान आहात पंतप्रधानांसारखे वागा चहावाल्यासारखे वागू नका असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
विशेष म्हणजे याआधी असदुद्दीन ओवेसी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा टीकांचा भडीमार केला आहे. मात्र आता त्यांच्या भावानेही म्हणजेच अकबरूद्दीन ओवेसीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मात्र आता या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.