उत्तराखंड : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री मंडळाने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मंगळवारी लोकसभेत घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे. यात आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी देखील मोदींच्या गळ्यात कौतुकाची माळ घातली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेलया या निर्णयावरून “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील आंबेडकर” असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. तसेच ‘सबका साथ, सबका विकास’ हे लक्ष्य पूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे असल्याचेही रावत यावेळी बोलताना म्हणाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे कैवारी म्हंटले जाते. मोदी हे एकवीसाव्या शतकातील आंबेडकर असून त्यांनी गरीब आई वडीलांची मुले, समाजातील सर्व गरीब वर्गाचा विचार केला आहे. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी देशभरातील सामान्य वर्गाकडून खूप वर्षांपासून सुरू आहे. या निर्णयानंतर त्यांना फायदा होणार आहे, असे रावत म्हणाले.
बिल मंजूर
मंगळवारी लोकसभेत आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षणाचे बील पास झाले. आरक्षण संशोधन बिलास लोकसभेमध्ये ३२३ मतं पडली तर ३ मतं या विरोधात होती. या दरम्यान ३२६ सदस्य उपस्थित होते. दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांच्या उपस्थितीमुळे हे बिल पास झाले आहे. आज हे बिल राज्यसभेत मंजुरीसाठी जाणार आहे.
६० टक्के आरक्षण
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गासाठी सध्याच्या ५० टक्के आरक्षणाव्यतिरिक्त हे आरक्षण असणार आहे. त्यामुळे आता एकूण आरक्षण ८० टक्के झाले आहे.
केंद्रीय मंत्री मंडळाने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान मंगळवारी त्याबद्दलचे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. दरम्यान यावर भाष्य करणारी कविता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लोकसभेत सादर केली.
“सवर्णोंके आरक्षण के लिए लोकसभा में लाये है बिल, इसलिए आज मुझे बहुत अच्छा हो रहा है फिल. आरक्षण के वजह से मजबूत हो रही मोदीजी की हिल, क्यूँ की राफेल में नहीं हुआ है गलत डील. हमारे मोदीजी है बहुत ही है चलाख, इसलिए लाया है आरक्षण का बिल और ट्रिपल तलाक. पीएम मोदीजी का था अच्छा लक्षण, इसलिए मिल रहा है सवर्णों को आरक्षण. राहुल नहीं बल्की मोदीजी कर रहे है देश का रक्षण, २०१९ में हो जायेगा काँग्रेस का भक्षण. राहुल तुम मोदीजी के साथ मत खेलो बुरी चाल, वरना हो जाएगा तुम्हारा बहुत बुरा हाल. राफेल का मत फैलाओ हमारे सामने जाल, मोदीही जितेंगे २०१९ साल”.