चांदूर : वृत्तसंस्था – युवक काँग्रेसच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विविध समस्यांचे निवारण करण्यात यावे यासाठी समाजकल्याण उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. युवक काँग्रेसच्या निवेदना नंतर काही वेळातच उपायुक्तांनी वसतिगृहाची भेट घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहात जेवणामध्ये अळ्या, दुपारचे जेवण शाळेच्या अवेळी दिल्या जाते, टाकीत दूषित पाणी, विशेष म्हणजे ती टाकी वर्षातून दोन वेळा धुतली जाते. शिळे अन्न दिले जाते. आरोग्यविषयीची कुठलीही सुविधा नाही. मासिक भत्ता ६०० आहे तो कधीच वेळेवर दिल्या जात नाही.तेथील वॉर्डन विद्यार्थिनींवर अश्लील शिवीगाळ करतात. इतकेच नव्हे तर मुलींच्या रूमची तसेच बाथरूमची स्वच्छता त्यांच्याकडूनच करून घेतल्या जाते.
यासर्व बाबी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लक्षात आल्या त्यादरम्यान युवक काँग्रेसच्यावतीने समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांनी एका तासातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली. दरम्यान त्यांनी वसतिगृहातील मुलींची विचारपूस केली. त्यावेळी या धक्कादायक बाबी समोर आल्या. याबाबत लवकरच कारवाही केली जाईल असेही ते म्हंटले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष परीक्षित जगताप, पंकज मोरे, संदीप शेंडे, मोहम्मद शहजाद सौदागर, सागर यादव, नीलेश गुहे, सुमेध सरदार, राजू लांजेवार, सुजित माकोडे, सौरभ ईटके आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.