लखनऊ : वृत्तसंस्था – चंद्रशेखर आजाद हेच माझे अधिकृत नाव आहे, कदाचीत यापुढे मला चुलबुल पांडे या नावानेही ओळखले जाऊ शकते, त्यामुळे रावण नाही तर चुलबुल पांडे या नावाचा वापर करावा असा मज्जाव भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी केला आहे.
लखनऊमध्ये सोमवारी ( २६ नोव्हेंबर ) एका कार्यक्रमासाठी आले असता चंद्रशेखर आजाद हेच माझे अधिकृत नाव आहे, कदाचीत यापुढे मला चुलबुल पांडे या नावानेही ओळखले जाऊ शकते, त्यामुळे रावण नाही तर चुलबुल पांडे या नावाचा वापर करावा इतकेच नव्हे तर भाजपाकडून आपल्याला अपमानित करण्यासाठीच रावण नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याचबरोबर सध्या देशात राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे, त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी मतदारांमध्ये रामाचे पाठीराखे आणि रावणाचे पाठीराखे असे म्हणत फूट पाडू नये. माझा कुणीही रावण म्हणून उल्लेख करू नये. असे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर मला जर रावण म्हणाल तर कायदेशीर कारवाई करेन, असा इशाराही त्यावेळी चंद्रशेखर यांनी दिला. याचबरोबर ‘जेलमधून बाहेर आल्यानंतर प्रत्येकजण मला ‘रावण’ नावाने ओळखायला लागले. मीडियासह काही लोकांनी मला ‘रावण’ नावाने संबोधण्यास सुरुवात केली आहे. मला हे नाव नकोय. सगळीकडे ‘रावण’ नावाची चर्चा आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष याचा फायदा घेऊ शकतात. मतदरांना राजकीय पक्ष राम आणि ‘रावण’ यांच्यामध्ये एकाची निवड करण्यास सांगू शकतात. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे लोकसभेची आगामी निवडणूक लढविणार नाही. त्याऐवजी भाजपाविरुद्ध विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवारांना पाठिंबा देऊ,असे भीम आर्मीने स्पष्ट केले आहे. याचबरोबर देशभरातील दलित आणि मुस्लिम समुदायाने राज्यघटना बदलण्याची भाषा करणा-या भाजपाचा पराभव करण्यासाठी एका झेंड्याखाली यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, तसेच लोकसभेची निवडणूकही लढविणार नाही. तथापि, भाजपाविरुद्ध बहुजन समाजाला जागरूक करून संघटित करणार आहोत, असेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले.