तिरुअनंतपुरम : बहुजननामा ऑनलाईन – शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती रेहाना फातिमाला धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पथानामथिट्टा पोलिसांनी अटक केले आहे.
सुप्रीम कोर्टाने २८ सप्टेंबर रोजी अय्यप्पा मंदिरात दहा ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी रद्दबातल ठरवली. शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले होते. १८ ऑक्टोबरपासून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ती रेहाना फातिमा यांनी ऑक्टोबर महिन्यात शबरीमला मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीरेहाना फातिमा यांच्या मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न नंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता.
इतकेच नव्हे तर रेहाना फातिमा यांनी लाखो हिंदू भक्तांचच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. याचबरोबर रेहाना फातिमाने जी फेसबुक पोस्ट लिहिली होती त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हिंदू भक्तांचच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली रेहाना फातिमा यांना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने शबरीमाला मंदिरात प्रवेशाला हिरवा कंदील दिल्यावर रेहाना फातिमाने या मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता. तिला अडवण्यात आले तेंव्हा तिने तिथेच ठीय्याही मांडला होता. गाभाऱ्या पासून मीटर अंतरावर तिला रोखण्यात आले. त्यानंतर बराच गदारोळही मजला होता. मला अय्यप्पाचे दर्शन घ्यायचे आहे. मी सगळ्या धर्मांवर विश्वास ठेवते. आणि सगळ्या धर्मांचा सन्मान करते असेही रेहाना फातिमाने म्हंटले आहे.