वाशिम : बहुजननामा ऑनलाइन – धनगर आरक्षण प्रश्नावर सोलापुरात शांततेच्या व संविधानिक मार्गाने काळे झेंडे दाखवून निषेध करणाऱ्या धनगर समाज बांधवांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी युवा मल्हार सेना व धनगर समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद आहे की, सोलापुर येथील शांततेच्या व संविधानिक मार्गाने तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध व रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी अधिकाराचा दुरपयोग करुन पोलिसांनी समाज बांधवावर केलेल्या लाठी हल्ल्याचा प्रखर निषेध करण्यात आला.या हल्ल्याची सखोल चौकशी करुन दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द तत्काळ निलंबनाची कारवाई करा. अशी मागणी युवा मल्हार सेना व समस्त धनगर समाज बांधवाच्या वतिने करण्यात आली.
सदर निवेदनावर रवि लांभाडे, विलास लांभाडे, ज्ञानेश्वर मुखमाले, संतोष लांभाडे, सुरेश मुखमाले, उमेश गायके, चेतन लांभाडे, कुलदिप गाढवे, यशवंत खोडके, रामा लांभाडे आदिंची उपस्थिती होती.