आरक्षणासाठी लवकरच सरकार सोबत बैठक लावू
बिदाल : बहुजननामा ऑनलाइन – धनगर आरक्षणाचा अभ्यास असणाऱ्या लोकांना विचारात घेऊन महाराष्ट्रातील धनगर आरक्षणासाठी लवकरच सरकार सोबत बैठक घडवण्याचे काम मी करणार आहे. आरक्षाणासाठी लागेल ती मदतही देण्यास मी तयार आहे. अशी ग्वाही खा.उदयनराजे भोसले यांनी दिली.
मराठा, ओबीसी समाजानंतर आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. दरम्यान तिसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी म्हसवड येथे खा.उदयनराजे भोसले आले होते. दरम्यान धावपळीच्या जगात साहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे. धनगर आरक्षण तुमचा अधिकार आहे. त्यावर अवलंबून न राहता विचारात व्यापकता आली पाहिजे. साहित्य वाचल्याशिवाय ऊर्जा मिळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सांगितले आहे की, मागास समाजास शिक्षणाची व रोजगाराची संधी दिली पाहिजे. धनगर समाज आजही मागासलेला आहे. कोणाचेही सरकार आले तरी धनगर समाजास आरक्षण द्यावेच लागेल. असे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर धनगर आरक्षणाचा अभ्यास असणाऱ्या लोकांना विचारात घेऊन महाराष्ट्रातील धनगर आरक्षणासाठी लवकरच सरकार सोबत बैठक घडवण्याचे काम मी करणार आहे. आरक्षाणासाठी लागेल ती मदतही देण्यास मी तयार आहे. अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
याचबरोबर धनगर समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक झाली आहे. असे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले, आ. गणपतराव देशमुख यांनी म्हंटले.
यावेळी, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार विजयराव मोरे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले, संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे, बाळासाहेब कर्णधार, डॉ. एस. आर. चोपडे, उत्तमराव खांडेकर, अमोल पांढरे, छगन पाटील, विठ्ठलभाई विरकर, बबन विरकर आदी मान्यवर उपस्थित होते.