मुज्जफरनगर : बहुजननामा ऑनलाइन – कश्मीर मध्ये बर्फ वृष्टी होत असल्याने उत्तर प्रदेशात थंडीची लाट पसरली आहे. या थंडीच्या कडाक्यात एका व्यक्तीने केलेल्या कृतीने पोलीस प्रशासनची झोप उडवून दिली आहे. एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ब्लँकेट पांघरले आणि पुतळ्या समोर शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर येथे घडली असून असे कृत्य करणारा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
एका स्थानिक व्यक्तीने आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार पहिल्या नंतर त्या प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांनी या प्रकारचा तपास सुरु केला असता पोलीसांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला ब्लँकेट पांघरणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना अटक केल्यावर तो व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे निदर्शनाला आले. पोलीसांनी अटक केलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता ती व्यक्ती पोलीसांना म्हणाला कि , बाबासाहेबांना थंडी वाजू नये म्हणून आपण बाबासाहेबांना ब्लँकेट पांघरले असे या व्यक्तीने सांगितले आहे. आपण जशी थंडी वाढल्या नंतर शेकोटी पेटवतो. तशी मी बाबासाहेबांच्या समोर शेकोटी पेटवली असे त्याने पोलिसांना दिलेल्या जबानी मध्ये म्हणले आहे.
कठैली पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली केली असता अशी माहिती मिळाली कि, बाबासाहेबांच्या पुतळ्याला ब्लँकेट पांघरणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी स्थानिक दलित चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मदतीने घेतला. त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आले असता तेथे तो मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली असे पोलीस अधिक्षक ओमवीर सिंग यांनी माध्यमांना सांगितले आहे.