माजलगाव येथील पोलिस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी ‘अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या २१ दलितांना मी फोडून काढले आहे. अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी जे येतात त्यांना मी जास्त मारते ‘, असे धक्कादायक वक्तव्य केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या त्या बेताल वक्तव्या मुळे सर्व स्तरांतून टीकेचा भडीमार होत आहे. दरम्यान त्यांच्या अश्या बेताल वक्तव्यामुळे दलित समाजाचे मन दुखवले गेले आहे. त्यामळे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा यासाठी जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने आज सोमवारी ( ३ नोव्हेंबर ) उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
इतकेच नव्हे तर राज्यात विविध ठिकाणी माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटाके यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली आहे. आज मुंबईमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. या वायरल व्हिडीओची चौकशी करण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी यांना नेमण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणाचा तपास हा बीडबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटाके यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी बाबूराव पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.