जालना : बहुजननामा ऑनलाईन – शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना जालन्यात येण्यापासून थांबवावे, अन्यथा दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा गर्भित इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद, वंचित आघाडीचे नेते सुधाकर निकाळजे, अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक अध्यक्ष दादाराव लहाने, भारिपचे नेते भास्कर शिनगारे, यांनी दिला.
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ६ जानेवारी रोजी ३३ मण सिंहासनाच्या निमित्ताने येणार आहेत. दरम्यान विविध संघटना एकत्र येऊन त्यांच्या या कार्यक्रमाला विरोध केला आहे. इतकेच नव्हे तर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना जालन्यात येण्यापासून थांबवावे, अन्यथा दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद, वंचित आघाडीचे नेते सुधाकर निकाळजे, अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक अध्यक्ष दादाराव लहाने, भारिपचे नेते भास्कर शिनगारे, यांनी दिला.
इतकेच नव्हे तर पोलीस प्रशासन भारतीय जनता पक्ष आणि बजरंग दलाच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच हा कार्यक्रम संभाजीनगर येथील श्री देवता मंदिरात होणार असल्यामुळे तेथील नगरसेवक भास्कर दानवे हे देखील यामध्ये सहभागी असल्याचेही त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची कुठलीही जाहीर सभा किंवा जाहीर कार्यक्रम नसल्यामुळे संभाजी भिडे गुरुजींना जालन्यात येण्यापासून थांबविता येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली असे सूत्रांमार्फत समोर आले आहे.