पुणे : बहुजननामा ऑनलाइन
केवळ शरीरानेच राष्ट्रवादीत असणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडणार नाहीत, मात्र त्यांचे मन वंचित आघाडी आणि ओबीसींमध्ये आहे. असे भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वांद्रे येथील एमइटीच्या कार्यालयात भेट घेतली. दरम्यान भेटी नंतर भुजबळ यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी ही भेट घेतलेली असली तरी त्यात विविध राजकीय अंगाने सखोल चर्चा झाली. असे भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर भुजबळ यांच्याकडून आमच्या वंचित आघाडीची आणि ओबीसींच्या राजकारणावर सविस्तरपणे चर्चा झाली. ते सध्या राष्ट्रवादी सोडणार नसले तरी मनाने पूर्णपणे आमच्यासोबत आहेत. शिवाय वंचित आघाडीच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादावर भुजबळ आनंदी आहेत. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना आगामी काळात रोखण्यासाठी काय करता येईल, यावर आमची सविस्तर चर्चा झाली. आम्ही त्यांना वंचित आघाडीत येण्याचे आवाहन केले, मात्र ते काय करतील हे माहिती नाही. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. इतकेच नव्हे तर वंचित आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या गळाला लागावेत, यासाठी ‘भुजबळास्त्र’ वापरल्याचे चर्चा होत आहे.