पिंपरी : सकल विद्यापती ज्ञान सत्संगती,शास्त्र शासनमती बुद्धी तेजा, आद्य कुलभूषण तू भीमराजा, अशा महामानवाची म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आज १२७ वी जयंती.पिंपरी-चिंचवड परिसरात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृति पुतळ्यावर आज सकाळी अकरा वाजता पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे,उपमहापौर शैलजा मोरे,उप-अभियंता संजय कांबळे,अभियंता रवींद्र दुधेकर याच्या हस्ते हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुक काढण्यात आली. लहान मोठ्यासह जय भीमच्या जय घोषाना देत या महामानवाला आदरांजलि वाहन्यात आली. पिंपरीच्या मध्यवर्ती असलेल्या आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भीम सैनिकांनी जंयतीच्या उत्सवाला सुरूवात केली गेली. तसेच परिसरात आंबेडकरांना अभिवादन करणारी सुरेख रांगोळीही काढण्यात आली आहे. लोक पुतळ्यासमोर अगरबत्ती व मेणबत्या लावून प्रार्थना करत होते. त्यामुळे पिंपरी चौक परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.तसेच आज चौकातील प्रत्येक भागात आणि गल्लोगल्ली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे फलक लावले होते.चौकात शेकडो भीमसैनिक जमा झाल्याने गर्दी झाली होती.