लातूर : बहुजननामा ऑनलाइन – दलित साहीत्य अकॅडमी तर्फे समाजकार्यासाठी दिला जानारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड हा राष्ट्रीय पुरस्कार निलंगा येथील मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांना जाहीर झाला असून याचे वितरण 34 व्या राष्ट्रीय दलित साहित्य संमेलनात नवी दिल्ली येथे केले जाणार आहे.
हा पुरस्कार डॉ. नरसिंह भिकाणे यांनी गेली 20 वर्ष केलेल्या समाजकार्याची नोंद घेऊन दिलेला आहे. त्यांनी प्रामुख्याने दलित असलेल्या वडार, मसणजोगी, कैकाडी, लमानी त्याच सोबत दुष्काळी शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी सदोदित शेकडो आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून मोफत तपासणी व औषध वाटप केले आहे.
तसेच एक डॉक्टर असूनसुद्धा ते सांप्रदायिक माध्यमातून हभप प्रवचनकार म्हणून जनतेला अंधश्रद्धा निर्मूलन, वेसनमुक्ती आणि शौचालय बांधणी याचे प्रबोधन करत असतात. त्याचप्रमाणे राजकीय माध्यमातूनही सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी वेगवेगळी आंदोलने करून विविध जनहिताच्या आणि शेतकरीहिताच्या विषयावर आवाज उठवत असतात. या पुरस्काराचे वितरण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवी दिल्लीयेथें होणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे जनतेतील सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे.